संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीवर वसलेल्या अरुण्या सोसायटी – परंडवाल सिटी, देहूगाव येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सोसायटीतील वीर जवान नायब सुभेदार श्री सचिन जाधव सर आणि रिटायर्ड आर्मी श्री भोसले साहेब यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजारोहणाने झाली. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना पहिला मान देण्यात आला, तर महाराष्ट्र पोलीस यांनाही सन्मानपूर्वक मान देण्यात आला.
आर्मी वीरांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहणाचा गौरवशाली क्षण-
लहान मुलांनी देशभक्तीपर भाषणे, कविता आणि गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोसायटी परिसरात “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
लहान मुलांचे देशभक्तीपर भाषण सादरीकरण –
या सोहळ्याचे आयोजन सोसायटीचे चेअरमन श्री संतोष सपकाळ साहेब, सेक्रेटरी श्री वैभव कवर साहेब, खजिनदार श्री जयकुमार खुळ साहेब आणि संपूर्ण कमिटी टीमने अतिशय छान पद्धतीने पार पाडले.
सोसायटी कमिटी व रहिवाशांचा एकत्रित देशभक्तीचा जल्लोष –
अरुण्या सोसायटी कमिटी टीम मधून इजाज अत्तार साहेब, आयुष उसरे साहेब, मिलिंद घुटे साहेब, प्रशांत कानडे साहेब, अविनाश भामरे साहेब , राहुल दळवी साहेब यांनी कार्यक्रमाची मांडणी, सजावट आणि व्यवस्था उत्कृष्टरीत्या केली.
मुख्य म्हणजे, कार्यक्रमाचे संचालन श्री रमेश धमशेट्टी साहेब यांनी अत्यंत आकर्षक व नेमक्या पद्धतीने पार पाडले, ज्यामुळे संपूर्ण सोहळा अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाचे कुशल संचालन करताना श्री रमेश धमशेट्टी साहेब.
कार्यक्रमात सर्व रहिवाशांनी उत्साहाने सहभाग घेतला. देशभक्तीचा हा सोहळा ऐक्य, प्रेम आणि अभिमानाची जाणीव करून देणारा ठरला.